Indian Proud Uncategorized

मलावथ पूर्णा: एव्हरेस्ट सर करणारी सर्वात लहान मुलीबद्दल माहित आहे का.??

मलावथ पूर्णा: एव्हरेस्ट सर करणारी सर्वात लहान मुलीबद्दल माहित आहे का…!!

मलावथ पूर्णा बद्दल जाणून घेऊया कि कसं तिने एवरेस्ट सर केला आणि तिचा हा प्रवास कसा होता ते पाहूया. माउंट एव्हरेस्टवर चढाई करणा-या सर्वात लहान 13 वर्षीय भारतीय आदिवासी शालेय मुलीची इच्छा आहे  की ती आदिवासी मुलांसाठी आदर्श बनावी.

मलावथ पूर्णा

Source: YouTube

मलावथ पूर्णा म्हणाले की, रविवारी शिखरावर पोहचल्यानंतर खूप “भारी” वाटले. तिने शिखरावर पोहचल्यानंतर भारतीय ध्वज फडकावला आणि तेथे दलित नेते बी. आर. आंबेडकरांचा फोटोही सोडला. अधिका-यांनी सांगितले की तिची कामगिरी अधिक प्रभावी आहे कारण ती अधिक कठीण तिबेटी बाजूवरून शिखरावर पोहचली.

बऱ्यापैकी गिर्यारोहक नेपाळच्या बाजूने एवरेस्ट सर करण्याचा प्रयन्त करतात, कारण नेपाळपासून त्याचे अंतर ८८४८ मीटर (२९०२९ फूट) असून चढायला सोपे आहे. परंतु नेपाळ 16 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या गिर्यारोहकांना जगातील सर्वात उंच पर्वत सर करण्याची परवानगी देत नाही.तिने एक अनुभवी गिर्यारोहक शेखर बाबू, तिच्या मित्रा आनंद कुमार या आपल्यासारख्या गरीब कुटुंबातील 16 वर्षीय मुलगा आणि शेरपाचा समूह यांच्याबरोबर चढाई केली.

मलावथ पूर्णा

Source: Pinterest

मलावथ पूर्णासाठी हि दुर्मिळ संधी

मी सुरुवातीला खूप घाबरत होते, परंतु मला मिळालेल्या प्रशिक्षणामुळे मला माझ्या भीतीवर मात करण्यास मदत झाली. मी हे सोडून देण्याचाविचार कधीच केला नव्हता,” असे मलावथने सांगितले.

“माझ्या मोहीमेचे ध्येय म्हणजे माझ्यासारख्या पार्श्वभूमीच्या तरुण आणि विद्यार्थ्यांना प्रेरणा देणे, माझ्यासारख्या आदिवासींसाठी हि संधी फारच दुर्मिळ आहे आणि मी एक संधी शोधत होते जेथे मी माझ्या क्षमतेला सिद्ध करु शकले.”

मलावथ पूर्णा

Source: The Japan Times

वर चढण्या दरम्यान तिला सर्वाधिक चिन्ता होती ते  “जेवण पॅक केलेल्या खाद्यपदार्त्यांची” आणि ती म्हणते की तिला तिच्या आईच्या स्वयंपाकाला नक्की मिस करेल, विशेषत: तिच्या आईच्या हातच तळलेले चिकन.

पूर्णाचे दोन्ही पालक दक्षिण भारतातील आंध्र प्रदेशातील एका लहान आदिवासी गावात कृषी मजूर म्हणून काम करतात, दरवर्षी सुमारे 35,000 रुपये कमाई करतात.

मलावथ पूर्णा

Source: StarsUnfolded

गावातील स्थानिक शाळेत, तिच्या पालकांना व तिच्या शिक्षकांनी तिला खूप प्रोत्साहन दिले. पूर्णाने  प्रशिक्षण कार्यक्रमात आऊटडोअर ऍक्टिव्हिटीस नोंदणी केली. एव्हरेस्ट चढावची तयारी करण्यासाठी तिला दार्जिलिंग व लदाखच्या पर्वतांमध्ये प्रशिक्षण देण्यात आले.

15 एप्रिल रोजी एव्हरेस्टच्या बेस कॅम्पवर आल्यानंतर तीनच दिवसातच  नेपाळी डोंगरी भागात प्राणघातक हिमस्खलनामुळे 16 शेर्पास मरण पावले. पूर्णा म्हणते की, हे संकट तिला शिखरावर जाण्यापासून रोखू शकली नाही.

जगाच्या शिखरावरून पाहताना, ती म्हणते कि, “माझ्या भोवती फक्त पर्वत होते. ते अतिशय सुंदर होते.”

हे पण पहा: सिंधुताई सपकाळ: हजारो अनाथ मुलांच्या आईचा जीवन प्रवास एकदा नक्की वाचून पहा

About the author

admin

Advertise