Travel Uncategorized

महाराष्ट्राला लाभलेले सुंदर असे तोरणमाल हिल स्टेशन आणि तेथील अप्रतिम तलाव

तोरणमाल हिल स्टेशन

तोरणमाल हिल स्टेशन हे महाराष्ट्रामधल्या नंदुरबार जिल्ह्यातील नगरपालिका परिषदेमधील एक सुंदर हिल स्टेशन आहे. शहादा वरून आपण तिथे पोहोचू शकतो. तोरणमाल हे सातपुडा पर्वत रांगेतील एक थंड हवेचे ठिकाण आहे.

तोरणमाल हिल स्टेशन

Source: Ghumakkar

 

तोरणमाल येथील गोरखनाथ मंदिरात महाशिवरात्रीला हजारो भाविक उपस्थित असतात. महाशिवरात्रीला यात्रेकरू दिवस-दिवस भर उन्हात अनवाणी पायाने चालत येतात. हे यात्रेकरू नंदुरबार जिल्ह्यात आसपासच्या परिसरातुन येतात, तसेच महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि गुजरातमधूनही येतात.

तोरणमाल हिल स्टेशन हे समुद्र सपाटीपासून १,१५० मीटर म्हणजेच ३,७७० फूट उंचीवर आहे.

 

भौगोलिक माहिती

तोरणमाल हा एक लहान पठार आहे जो साधारणतः ४१.४३ चौरस किमीच्या परिसरात पसरलेला आहे. पठाराचा आकार सॉकरसारखा आहे व तिथे दक्षिण-उत्तर अशे वारे वाहतात.

पठाराच्या दक्षिणेकडील भागातील प्रवाह सुखद अनुभव देतात. येथील यशवंत तलाव हा १.५९ किमी चौरसाच्या अंतरामध्ये पसरला आहे. त्याची खोली जास्तीत जास्त २७ मीटर असेल.

तोरणमाल हिल स्टेशन

Source: Holidify

पुढे त्याचा प्रवाह उत्तरेकडील लोटस लेक ला जाऊन मिळतो. हा तलाव नेहमी लोटसच्या फुलांनी झाकलेला असतो म्हणून त्याचे नाव लोटस लेक असे पडले आहे. सीता दरीतील खडकांमध्ये हा प्रवाह खालच्या दिशेने पुढे जातो. ह्या प्रवाहाचे रूपांतर पावसाळ्यामध्ये धबधब्यात होते.

जाण्याचे मार्ग

तोरणमाल शहादा शहरापासून सुमारे ५५ कि.मी. च्या अंतरावर आहे. शहादा नाशिकपासून सुमारे ३०५ कि.मी. आहे आणि सुरतपासून सुमारे २०० किलोमीटर एवढे अंतर आहे. शहादा शहरापासून जवळचे रेल्वे स्थानक नंदुरबार आणि दोंडाईचामध्ये ज्यांचे यानंतर अनुक्रमे ७६ कि.मी. आणि ७५ कि.मी. आहे. जर मुंबईवरून जायचे म्हणजे तर ५१० कि.मी. एवढे लांब आहे. जवळचे विमानतळ सुरतमध्ये आहे.

तिथे आणखी पाहण्यासारखी ठिकाणे

यशवंत लेक

तोरणमाल हिल स्टेशन

Source: triphills.com

सनसेट पॉईंट

तोरणमाल हिल स्टेशन

Source: Wikipedia

चेक धरण

तोरणमाल हिल स्टेशन

Source: Wikipedia

गोरखनाथ मंदिर

तोरणमाल हिल स्टेशन

Source: tourmet.com

लोटस लेक

तोरणमाल हिल स्टेशन

Source: HolidayIQ

सीता खाई

तोरणमाल हिल स्टेशन

Source: Panoramio

वन उद्यान व औषधी वनस्पती उद्यान

तोरणमाल हिल स्टेशन

Source: Justdial

कॉफी गार्डन पॉईंट

नागार्जुन पॉइंट

सात पायरी (सात पावले) पॉईंट

हे पण पहा: महाराष्ट्रातील मराठ्यांनी काबीज केलेल्या अर्नाळा किल्ल्याच्या इतिहासाबद्दल रोमांचक गोष्टी माहिती आहे का.?

Advertise