Entertainment Uncategorized

९० चे दशक गाजवणाऱ्या ह्या बॉलीवूड अभिनेत्र्यांबद्दल माहिती आहे का.?

९० च्या दशकातील अश्या १० अभिनेत्र्या ज्यांनी संपूर्ण बॉलीवूड गाजवून टाकले

९० च्या बॉलीवूडचा काळ हा खरोखरच एक सुवर्णयुग होता ज्यामध्ये बऱ्याच सुंदर आणि प्रतिभावान अभिनेत्रींनी बॉलिवूड आणि प्रेक्षकांच्या हृदयामध्ये आपले स्थ्यान मिळवले. त्यावेळी बऱ्याच अश्या नायिका होत्या ज्या नायकांपेक्षा जास्त प्रसिद्ध होत्या. ९०च्या दशकामध्ये मोठ्या प्रमाणात हिट चित्रपट प्रदर्शित झाले. त्यातील काही नवे म्हणजे दिलीवाले दुल्हनिया ले जायेंगे, हम आपके है कोन, कुछ कुछ होता है, कारण अर्जुन, दिल तो पागल है, मोहरा, रंगीला, राजा हिंदुस्थान, हम दिल दे चुके सनम, परदेस आदि आहेत.

१. माधुरी दीक्षित

top actress 90s

Source: Bollywood Bee

माधुरी दीक्षित ह्यांचे डान्स आणि अभिनयाचे एक्स्प्रेशन एवढे चांगले आहेत कि त्यांच्या एक्स्प्रेशना कोणीच तोड देऊ शकत नाही. तिने लवकरच तिच्या अद्भुत नृत्यासह आणि अभिनयासह तिने आपली बॉलीवूडमध्ये छाप सोडली आहे. ती लाजाळू सून किंवा उत्कट प्रेमी, एक प्रतिबोधक कन्या किंवा दृष्टिक्षेपणीतील एक कुमारिका असे अनेक पात्र ,म्हणून तिने अभिनय केला आहे. तिचे हसणे अद्याप सर्व प्रेक्षकांसाठी खूप कौतुकाचे आहे. मंत्रमुग्ध सौंदर्य, भव्य नृत्य कौशल्ये, अविश्वसनीय अभिनय कौशल्ये,  बॉक्स ऑफिस पुल, अष्टपैलुत्व आणि प्रतिष्ठित दर्जाची एक परिपूर्ण नायिका म्हणजेच माधुरी.

२.  मधुबाला

top actress 90s

Source: Yummy Wallpapers | HD Widescreen Wallpaper

बऱ्याच अभिनेत्रांसाठी ती एक आयडॉल आहे पण तिच्या सारखे मोहक सौंदर्य अजून कोणालाच लाभले नाही. तिचे सौंदर्य एवढे होते कि ती फक्त एक काळा आणि पांढरा स्क्रीनवर सुद्धा तिचे सौंदर्य उठून दिसत होते. ती केवळ तिच्या दिसायलाच चांगली नव्हती तर तिला खूप छान अभिनय कौशल पण होते. खरेतर ‘मुघल-ए-आझम’ या चित्रपटातील ‘प्यार किया तो डरना क्या’ आजही आपल्या आठवणींमध्ये अमर आहे. दुःखाची बाब म्हणजे मधुबालाचा जन्मजात हृदयरोगासह जन्म झाला होता म्हणून त्या खूपच आधी बॉलीवूड जगाला सोडून गेला.

३. दिव्या भारती

top actress 90s

Source: Indya101.com

दिव्या भारती ९० च्या दशकात भारतीय चित्रपटसृष्टीतील यशस्वी नायिका होती. ती खूप कमीकाळ बॉलीवूडमध्ये होती. परंतु ती एक अशी नायिका होती जिने थोड्या अवधीत लाखो लोकांची हृदये जिंकली होती. तीच फिल्म करिअर खूप कमी होत कारण खूप कमी वयातच तिचा मृत्यू झाला. तिने ९० च्या सुरवातीला कारकिर्दीस सुरुवात केली आणि फक्त तीन वर्षांत अनेक चित्रपट यशस्वी केले. विश्वात्मा, दिल का क्या कसूर, दिल आशना है, दिवाना, शोला और शबनम, बलवान, दिल हि तो है, क्षत्रिय इत्यादीं काही आहेत. दिवाण आणि शोला और शबनम हे तिचे दोन ब्लॉकबस्टर हिट चित्रपट आहेत. त्या वेळी तिला सर्वात चुलबुली आणि सुंदर नायिका मानले जायचे. तिची उपस्थिती खूप गोड होती. असे मानले जाते की जर ती जिवंत असती तर ती ९० च्या दशकातील सर्वोत्तम अभिनेत्री असली असती.

४. रवीना टंडन

top actress 90s

Source: InsiderIndian

या यादीतल आणखी एक नाव म्हणजे रवीना टंडन. आपण नव्वदच्या दशकातील त्यांचं यश विसरू शकत नाही. १९९१ साली त्यांनी पत्थर के फूल यांच्याबरोबर आपली कारकीर्द सुरु केली ज्यात तिला फिल्मफेअर लक्स न्यू फेस ऑफ द ईअर चा अवॉर्ड मिळाला होता. त्यानंतर मात्र तिने अनेक चित्रपट फ्लॉप  गेले. पण मोहरा आणि दिलवाले नंतर समीक्षकांनी त्यांच्या कामाची प्रचंड प्रशंसा केली आणि तिला खूप मोठी ओळख मिळाली. तिचे खिलाडीयों का खिलाडी आणि जिद्दी हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरले. तिने गोविंदासोबत दुल्हेराजा, अनारी नं. १, आंटी नं. १, बडे मियान छोट मियान सारख्या विनोदी चित्रपटांमध्ये काम केले आहे आणि त्या चित्रपटांना प्रेक्षकांना मोठ्या प्रमाणात आवडले. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून तिने 2 वेळा फिल्मफेअर पुरस्कार जिंकला आहे.

५. जुही चावला

top actress 90s

Source: New HD Wallpapers

जुही चावला एक उत्तम अभिनेत्री आहे जिला आपण कधीच विसरू शकत नाही. भारतीय चित्रपटातील सर्वात चुलबुली अभिनेत्री म्हणून तिला ओळखले जाते. तिचा अभिनय नेहमी लोकांना आकर्षित करायचा. तिने ८० व्या दशकाच्या सुरुवातीला तिच्या चित्रपट करिअरची सुरुवात केली आणि ९० च्या दशकात तिने खूप नाव कमावले. तिचा दुसरा चित्रपट कयामत से कयामत हा एक ब्लॉक बस्टर हिट ठरला आणि तिला फिल्मफेअर लक्स न्यू फेस ऑफ द ईअरचा पुरस्कार मिळाला आणि यशस्वी अभिनेत्री म्हणून ओळख झाली. तिने केलेले काही चित्रपट म्हणजे डर (१९९३), इश्क (१९९७), हम है राही प्यार के (१९९३), यस बॉस (१९९७), बोल राधा बोल (१९९२), दीवाना मस्ताना (१९९७), राजू बन गया जेंटलमॅन (१९९२), अर्जुन पंडित (१९९९). त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक अष्टपैलू भूमिका घेतल्या आणि हम है राहि प्यार के साठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता.

६. शिल्पा शेट्टी

 

top actress 90s

Source: HD Wallpapers

शिल्पा शेट्टीला त्यांचा विवाह राज कुंद्रा यांच्याशी झाल्यानंतर शिल्पा शेट्टी कुंद्रा या नावानेही ओळखले जाते. शिपा शेट्टी खूप छान नायिका आहे आणि एक तंदुरुस्त अभिनेत्री म्हणून पण ओळखली जाते. १९९२ मध्ये त्यांनी बाझीगर चित्रपटासोबत करिअरची सुरुवात केली आणि सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार सुद्धा पटकावला.  त्यानंतर ती बऱ्याच हिट चित्रपटांमध्ये दिसली. औजार, मैं खिलाडी तू अनारी, आओ प्यार करे, गॅम्बलर, हतकडी, छोटे सरकार, हिम्मत, इन्साफ, परदेसी बाबू, लाल बादशाह, धडकन हे त्यातील काही हिट्स आहेत. धडकन हा चित्रपट तिच्या कारकीर्दीतील सर्वोत्कृष्ट चित्रपट आहे. या काळात तिने अनेक उत्कृष्ट चित्रपट केले आणि स्वत: ला एक यशस्वी बॉलिवुड अभिनेत्री म्हणून प्रस्थापित केले.

७. करिष्मा कपूर

top actress 90s

Source: fansshare.com

करिष्मा कपूर अभिनेता रणधीर कपूर आणि बबिता यांची मुलगी आहे आणि करिना कपूर खान हिची बहीण. ती एक सुंदर अभिनेत्री आहे आणि तिने नव्वदच्या दशकात अनेक हिट चित्रपट दिले आहेत. तिने भारतीय चित्रपट सृष्टीमध्ये एक यशस्वी अभिनेत्री म्हणून तिची ओळख स्थापित केली आहे. तिचे काही चित्रपट: जिगर (१९९२), अनारी (१९९३), राजा बाबू (१९९४), हिरो नं. १ (१९९७), बीवी नो. १ (१९९९), दिल तो पागल है (१९९६), राजा हिंदुस्थानी (१९९६), हम साथ साथ है (१९९९) इत्यादी आहेत. तिने  गोविंदा आणि सलमान खान यांच्याबरोबर अनेक विनोदी चित्रपट केले आहेत. तिचा चित्रपटात ‘राजा हिंदुस्तानी’ हा ब्लॉक-बस्टर हिट होता आणि त्यासाठी तिला फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. २००३ मध्ये करिष्मा कपूर बिझनेस मॅन संजय कपूर यांच्यासोबत विवाहबद्ध झाल्या. दिल तो पागल है या चित्रपटासाठी तिला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कारही मिळाला आहे. ती एक खूप प्रतिभावान अभिनेत्री आहे.

८. मनीषा कोइराला

top actress 90s

Source: Daily Post India

मनीषा कोइराला या यादीतील एक सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आहे. ९० च्या दशकातील ती एक अमेझिंग अभिनेत्री आहे. तिने सौदागर (१९९१) या हिंदी चित्रपटाद्वारे करिअरची सुरुवात केली आणि तो चित्रपट खूप हिट ठरला होता. नंतर तिने खामोशी, अकेले हम अकेले तुम, १९४२: अ लव्ह स्टोरी, बॉम्बे, गुप्त, दिल से, कच्चे धागे, मन या चित्रपटांद्वारे एक यशस्वी अभिनेत्री म्हणून स्वतःची ओळख बनवली. त्यांनी खरोखर चांगले काम केले आणि त्यांनी आपल्या उत्कृष्ट अभिनयाद्वारे खूप लोकांची मने जिंकले. फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार म्हणून त्याला अनेकदा नामांकन मिळाले आहे. तिला एक अतिशय प्रतिभावान नायिका म्हणून ओळखले जाते कारण तिने आपल्या चित्रपटांमध्ये अनेक अष्टपैलू आणि  स्त्री प्रधान भूमिका केल्या आहेत.

९. श्रीदेवी

top actress 90s

Source: Free Download Wallpaper HD – blogger

श्री देवी कपूर म्हणून ओळखले जाणाऱ्या श्री देवी, भारतीय उद्योगामध्ये पण त्यांच्या प्रचंड कार्यासाठी ओळखल्या जातात. नव्वदच्या दशकात त्यांनी अनेक उत्तम हिट दिलेत, जे कधीच विसरले जाऊ शकत नाहीत. ती त्या काळातील सर्वात सुंदर नायिका आहे आणि भारतीय सिनेमामधली प्रथम महिला सुपरस्टार मानली जाते. त्या काळातील तिची सर्वात सुपर हिट फिल्म्स म्हणजे लम्हे (१९९१), लाडला (१९९४), गुमराह (१९९३), जुदाई (१९९७), चालबाज (१९९०), चांदणी (१९८९)  त्यांचा अभिनय आणि नृत्य कौशल्य लोकांकडून नेहमीच आवडले आहे. त्यांनी तमिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम, हिंदी भाषेतील 100 हून अधिक चित्रपट दिले. ती भारतीय चित्रपटातील महिला सुपरस्टार आहे.

१०. उर्मिला मातोंडकर

top actress 90s

Source: Pinterest

१९९२ साली उर्मिला मातोंडकर यांनी चमत्कार या कल्पनारम्य चित्रपटातुन करीयरची सुरुवात केली.  तथापि, तिला रंगीला (१९९५) नंतर खूप ओळख मिळाली. रंगीला हा खूप हिट ठरला होता आणि त्यासाठी तिला बेस्ट ऍक्ट्रेस म्हणून पहिला फिल्मफेयर अवॉर्डसाठी नामांकन मिळाले. तिने सत्या, खूबसूरत, कौन,हम तुम पे मरते है, जानम समझा करो, छोटा चेतन, अफलातून, प्यार तुने क्या किया इत्यादिंसारख्या अनेक चित्रपटामध्ये काम केले आहे. तिने खूप उत्साहाने सर्व भूमिका केल्या आहेत. तिच्या कामातून तिचा अभिनयाबद्दलचे समर्पण दिसून येते. चायना गेट चित्रपटातील छम्मा छम्मा हे आयटम सॉंग मधील तिचे नृत्य खूपच छान आहे आणि ह्या गाण्याने अनेक व्यक्तींचे हृदय चोरले आहे . ती या कालखंडातील एक चांगली अभिनेत्री आहे.

हे पण पहा: १० अश्या गोष्टी ज्याने आपल्याला कळेल कि मुली गुप्तपणे आपल्यावर प्रेम करतात !!

About the author

admin

Advertise