Entertainment Indian Proud

सिंधुताई सपकाळ: हजारो अनाथ मुलांच्या आईचा जीवन प्रवास एकदा नक्की वाचून पहा

सिंधुताई सपकाळ: हजारो अनाथ मुलांची माता

सिंधुताई सपकाळ: भारताचा  जगात लोकसंख्येच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे आणि या लोकसंख्येचा एक महत्वपूर्ण भाग म्हणजे मुले आहेत. पण या मुलांचा एक भाग सहसा अनाथ किंवा बेबंद आहे हे एक कटू सत्य आहे. गरिबीत जगण्यासाठी आणि समाजाकडून निरंतर अपमानाचा सामना करावा लागतो. सिंधुताई सपकाळची कथा ही ह्या गोष्टीचा पुरावा आहे. सिंधुताई यांचा जन्म १४, नोव्हेंबर १९४८ रोजी वर्धा जिल्ह्यातील एका गुरे चराई करणाऱ्या कुटुंबात झाला.

सिंधुताई सपकाळ

Source: The Better India

त्यांना ‘चिंधी’ असे नाव देण्यात आले, याचा अर्थ समाजाकडून फाटलेल्या कापड असा आहे. परंतु सिंधुताईंची अधिक शिकण्याची इच्छा सर्वव्यापी होती. तिचे वडील तिच्या शिक्षणासाठी उत्सुक होते, पण त्यांच्या आईने या गोष्टीला विरोध केला. म्हणूनच त्यांना ४ थी पर्यंतच शिक्षण करता आले आणि लहान वयात म्हणजेच त्या १० वर्षाच्या असताना त्यांचे लग्न एका 30 वर्षाच्या माणसाशी करण्यात आले.

सिंधुताईंचा बालविवाह होऊनही त्या खचल्या नाही. त्याऐवजी त्यांना असहाय्य आणि अत्याचारग्रस्ताना    मदत करण्याची आवड होती. विवाह झाल्यानंतर वर्धामध्ये नवरगाव जंगलात स्थायिक होत्या. १९७२ मधील वन विभाग आणि जमीनदार जे गाईच्या शेण गोळा करणा-या गावातील स्त्रियांचा शोषण करत होते, त्या गोष्टीसाठी सिंधुताईंचा कडाडून विरोध होता. त्यांना माहित नव्हतं की, त्याच्या या  लढ्यामुळे त्यांच्या आयुष्यात काहीतरी वाईट घडणार आहे.

सिंधुताई सपकाळ

Source: THE OPTIMIST CITIZEN

त्यांच्या गर्भधारणेदरम्यान, एका चिडलेल्या जमीनदाराने त्यांच्या पतीला त्यांना घराबाहेर काढायला लावले. त्यांच्या पतीने सोडल्यामुले त्यांना समाजाकडून वाळीत टाकण्यात आले. १४ ऑक्टोबर १९७३ रोजी एका गोशाळेत त्यांची मुलगी ममता हिला जन्म दिला. सिंधुताई त्यांच्या स्वतःच्या घरी परत गेल्या, पण तिथेही त्यांच्या आईकडून त्यांना नकारांचा सामना करावा लागला. हरवलेला आणि विश्वासघात झालेल्या सिंधुताईंनी पॉट भरण्यासाठी रेल्वेगाडीतून गाणी म्हणत होत्या आणि भीक मागत होत्या. तिने स्वत: आणि तिच्या मुलीच्या अस्तित्वासाठी संघर्ष चालू ठेवला. स्वतःला आणि मुलीला सुरक्षित ठेवण्यासाठी  त्या स्मशानभूमीत राहत होत्या.

टिकून राहण्यासाठी सतत संघर्ष करताना, त्या महाराष्ट्राच्या अमरावती जिल्ह्यात स्थित चिकलदरा येथे गेल्या. येथे, वाघांच्या संरक्षणार्थ प्रकल्पामुळे ८४ आदिवासी गावे हद्दपार करण्यात आली होती. या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर एक प्रकल्प अधिकाऱ्याने आदिवासी गावकऱ्यांतील १३२ गायी जप्त केले आणि एक गायीचा मृत्यू झाला. सिंधुताईंनी असहाय्य आदिवासी गावकर्यांची योग्य पुनर्वसनासाठी लढा देण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या प्रयत्नांना वनाधिकार्यांनी स्वीकारले आणि त्यांनी पर्यायी पुनर्स्थापनेसाठी योग्य व्यवस्था केली.

सिंधुताई सपकाळ

Source: Moneylife

गरीबी, अपमान आणि बेघर होण्याच्या या अनुभवांच्या दरम्यान सिंधुताई अनेक असहाय्य अनाथांना व स्त्रियांना भेटल्या ज्यांना समाजाकडून निर्लज्जपणे दुर्लक्षित करण्यात आले होते. त्यांनी या अनाथांना दत्तक घ्यायला सुरू केले आणि काम केले आणि काहीवेळा त्यांना पोसण्यासाठी त्यांनी भीकही मागितली. सर्व अनाथ मुलांची आई होण्यासाठी त्यांनी ‘श्री दगडुशेठ हलवाई, पुणे, महाराष्ट्र’ मध्ये त्यांची स्वतःची मुलगी दत्तक दिली.

अनेक वर्षांनंतर कठोर परिश्रम घेतल्यानंतर त्यांनी पहिले आश्रम चिखलदरा येथे उभे केले. त्यांनी आश्रमांसाठी पैसे उभारण्यासाठी गावातील व शहरी भागातून प्रवास केला. निधीच्या अभावामुळे त्यांना बऱ्याच वेळा पुढच्या जेवणासाठी संघर्ष करावा लागला. पण सिंधुताई कधीही थांबले नाही. आजपर्यंत, त्यांनी १२०० अनाथ मुलांना दत्तक घेतले आहे आणि त्यांना प्रोत्साहन दिले. ते त्यांना ‘माई’ म्हणुन प्रेमाने हाक मारतात. त्यांच्या अनेक दत्तक मुलांमध्ये आता वकील आणि डॉक्टर आहेत. आता त्यांची मुलगी आणि दत्तक घेतलेली मुले त्यांचे स्वतःच्या अनाथाश्रम चालवत आहेत.

सिंधुताई सपकाळ

Source: बघू हा सिनेमा – blogger

विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांकडून सिंधुताई सपकाळ यांना सुमारे २७० पुरस्कार मिळाले आहेत. २०१० मध्ये “मी सिंधुताई सपकाळ” हा मराठी चित्रपट त्यांचा आयुष्यावर बनवण्यात आला. त्यांनी  महाराष्ट्रात अनेक संस्था स्थापन केल्या आहेत, जे हजारो अनाथ मुलांना शिक्षण आणि आश्रय देत आहेत. आजही, ६९ वर्षांच्या वयाच्या सिंधुताई सपकाळ या अनाथांचे भविष्य घडविण्यासाठी अविरतपणे काम करतात कारण त्यांचा विश्वास आहे की वंचित बालक म्हणजे वंचित राष्ट्र.

सिंधुताई सपकाळ

Source: The Better India

त्यांना भेटलेले पुरस्कार:

  • एकूण २७३ पुरस्कार
  • अहिल्याबाई होळकर पुरस्कर (महाराष्ट्र राज्य )
  • राष्ट्रीय पुरस्कार “आयकौनिक मदर”
  • सह्यद्री हिरकणी पुरस्कार
  • राजाई पुरस्कार
  • शिवलीला महिला गौरव पुरस्कार
  • दत्तक माता पुरस्कार
  • रियल हिरोज पुरस्कार (रिलायन्स कडून)
  • गौरव पुरस्कार

हे पण पहा: मन्या सुर्वे: मुंबईतील गुन्हेगारी जगतातील पहिल्या हिंदू डॉनची कथा

 

About the author

admin

Advertise