Entertainment Uncategorized

बिअर बार मध्ये जाणाऱ्या जिराफबद्दल माहिती आहे का.?

बिअर बार मध्ये जाणाऱ्या जिराफबद्दल माहिती आहे का.?नसेल तर एकदा नक्की हि पोस्ट पहा.

पर्डी जिराफ (जोहान्सबर्ग): बिअर पिण्याचा शौक असलेले लोक सुटीच्या दिवशी हमखास बार मध्ये जातात. मात्र, जर एखाद्या प्राण्याने असेच केले तर…?? तुमचा विश्वास बसेल का.?

पर्डी जिराफ

Source: YouTube

तुमचा विश्वास बसणार नाही कि साऊथ आफ्रिके मधील जोहान्सबर्ग येथील एक जिराफ नियमितपणे एका बारमध्ये हजेरी लावतो. त्या जिराफाचे नाव पर्डी आहे. हा जिराफ जोहान्सबर्गच्या लॉयन पार्कमध्ये राहतो.

त्याला बिअर बार एव्हडा आवडतो कि, ताजेतवाने होण्यासाठी तो जवळच्या बारमध्ये जातो. पर्डीची हिकृती पाहून बारमधील लोक आश्चर्यचकित होतात. पर्डी बारमध्ये आल्यानंतर सर्वात आधी आपल्या पोटोबाचे पाहतो.

पर्डी जिराफ

Source: Daily Mail

तो दररोज बारमध्ये येतो. त्यामुळे आता पर्यटकही त्याला पाहण्यासाठी मोठ्या संख्येने बारमध्ये येत असतात. या जिराफामुळे आपला धंदा वाढत असल्यामुळे बारमालकही त्याची रोज आतुरतेने वाट पाहत असतो.

पर्डी जिराफ

Source: Daily Mail

दररोज नियमित वेळेला येणार हा पर्डी त्याचे पेयपान आणि भोजन होईपर्यंत बारमध्येच थांबतो. बारमालक स्वतः त्याच्या खाण्या-पिण्याची व्यवस्था करतो.

हे पण पहा: महाराष्ट्रातील मराठ्यांनी काबीज केलेल्या अर्नाळा किल्ल्याच्या इतिहासाबद्दल रोमांचक गोष्टी माहिती आहे का.?

About the author

admin

Advertise