Entertainment Marathi Viral Uncategorized

मराठमोळ्या लावणीचा ठसका आता हॉलिवूड चित्रपटामध्ये पाहायला मिळणार!

मराठमोळ्या लावणीचा ठसका आता हॉलिवूड चित्रपटामध्ये पाहायला मिळणार!

Lavani in Hollywood: हॉलीवूडमध्येही राणी लक्ष्मीबाईंच्या जीवनावर एक चित्रपट तयार केला जाणार आहे. ह्या हॉलिवूड चित्रपटाचे नाव ‘स्वॉर्ड्स अँड सेप्टर्स’ असे असणार आहे. स्वाती भिसे या ह्या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. स्वाती भिसेची कन्या देविका भिसे, या चित्रपटात राणी लक्ष्मीबाईंची प्रमुख भूमिका साकारणार आहे.

शृंगाराची खाण आणि महाराष्ट्राची शान म्हणजे लावणी. महाराष्ट्रातील खऱ्या लाल मातीच्या गंधाने, लोकरंजन आणि संस्कृतीची परंपरा लावणीद्वारे महाराष्ट्राला लाभली आहे. लावणी या महाराष्ट्राच्या लोककलेने मराठी सिनेदृष्टीला सुवर्ण दिवस दाखवले. एकेकाळी लावणी ही सिनेमातील एक अविभाज्य भाग होती, जी काही कालांतराने चित्रपटातील लावणीला हद्दपार करण्यात अली. पण नटरंग या चित्रपटातून पुन्हा एकदा तो रसिकांना बघावयास मिळाला. लावणीबाबत आजच्या पिढीच्या मनात आत्मीयता जागृत व्हावी आणि त्याबद्दल माहित असावे तसेच सातासमुद्रापर याची महती पोहचावी या कल्पनेने हॉलिवूड सिनेमातही ठसकेबाज लावणी रसिकांना बघायला मिळणार आहे.

Lavani in hollywood

त्या हॉलिवूड चित्रपटाबद्दल थोडी माहिती:

हॉलीवूडमध्येही राणी लक्ष्मीबाईंच्या जीवनावर एक चित्रपट तयार केला जाणार आहे. ह्या हॉलिवूड चित्रपटाचे नाव ‘स्वॉर्ड्स अँड सेप्टर्स’ असे असणार आहे. स्वाती भिसे या ह्या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. स्वाती भिसेची कन्या देवकी भिसे, या चित्रपटात राणी लक्ष्मीबाईंची प्रमुख भूमिका साकारणार आहे. या सिनेमात फक्त हॉलीवूडचे कलाकार नसून आपले मराठमोळे कलाकारसुद्धा दिसणार आहेत. विशेष म्हणजे हॉलिवूड चित्रपटामध्ये प्रथमच रसिकांना लावणीचा ठेका बघायला मिळणार आहे. त्यामुळे रसिकांची चित्रपट पाहायची इच्छा शीगेला पोहचली आहे. आदेश वैद्य या डान्सरने चित्रपटाचे नृत्य दिग्दर्शन केलं आहे.

त्याने यापूर्वी बऱ्याच मालिकांसाठी तसेच २५ पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये नृत्य दिग्दर्शन केलेले आहे. आता आदेश सरळ हॉलीवुडला जाऊन पोहोचला आहे. या हॉलीवूड चित्रपट प्रोजेक्टसाठी त्याने खूप मेहनत घेतली आहे. असं म्हणलं जात आहे कि ही लावणी लाईव्ह शूट करण्यात आलेली आहे. ‘स्वॉर्ड्स अँड सेप्टर्स’ या चित्रपटात डेरेक जॅकोबी, नॅथानियल पारकर, रुपर्ट इवरेट हे ब्रिटिश कलाकार आहेत. तसेच नागेश भोसले, यतिन कार्येकर, मिलिंद गुणाजी, आरिफ झकारिया आणि अजिंक्य देव हे भारतीय कलाकारसुद्धा त्यांच्या सोबत या चित्रपटात पाहायला मिळतील. विशेष म्हणजे अजिंक्य देव हे तात्या टोपे यांची भूमिका साकारणार आहेत.

राणी व्हिक्टोरीयाची भूमिका हॉलिवुड अभिनेत्री जोधी मे ही साकारणार आहे. चित्रपटातील सुरुवातीचा भाग जयपूर आणि जोधपूर मध्ये चित्रीकरण केले जाईल. अंदाजे आठ आठवडे, हा चित्रपट जयपूर-जोधपूर येथे चित्रीत केला जाईल आणि त्यानंतर लंडन आणि मोरोक्कोमध्ये या चित्रपटातील राहिलेल्या भागाचे चित्रकरनं करण्याचे उओजाळे आहे. या वर्षी, २०१८ मध्ये, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या आयुष्यावर हा  हॉलीवूड चित्रपट रिलीस होणार आहे. पण निश्चितपणे हॉलीवूडचा चित्रपटामध्ये अजिंक्य देव, मिलिंद गुणाजी यांच्यासह इतर भारतीय कलाकारांची निवड अभिमानास्पद आहे.

हे सुद्धा पहा: राणी लक्ष्मी बाईंना नेमकं कोणत्या कारणामुळे झाशीची राणी संभोधले गेले .?

Advertise