Indian Proud Uncategorized

राणी लक्ष्मी बाईंना नेमकं कोणत्या कारणामुळे झाशीची राणी संभोधले गेले .?

राणी लक्ष्मीबाई यांचा जन्म १८२८ साली वाराणसीच्या मराठी कुटुंबात झाला. त्यांच्या बालपणाचे नाव मणिकर्णिका होते आणि लोक त्यांना प्रेमाने मनू म्हणून हाक मारत असे. त्यांच्या वडिलांचे नाव मोरोपंत तांबे होते आणि आईचे नाव भागीरथी बाई होते. त्यांचे आई-वडील महाराष्ट्रातून आले होते. जेव्हा मनू चार वर्षांची होती तेव्हा त्याची आई मरण पावल्या. त्याचे वडील बिठूर जिल्ह्यातील पेशवेच्या दरबरात काम करायचे. पेशव्यांनी मनुला आपल्या मुलीसारखे पालन-पोषण केले. पेशवे त्यांना ‘छबीली’ म्हणत असे. त्यांचे शिक्षण घरी होत असे आणि त्यांनी त्यांच्या लहानपणापासून नेमबाजी, घोडेस्वारी आणि तलवारबाजी शिकले होते.

jhashichi rani laxmi bai

Source: YouTube

मणिकर्णिका यांचा विवाह १८४२ मध्ये झांसीच्या महाराज गंगाधर राव नेवाला यांच्या सोबत झाले. त्यांच्या विवाहानंतर त्यांना हिंदू देवी लक्ष्मीच्या नावाने राणी लक्ष्मीबाई म्हणून ओळखले जाऊ लागले. राणी लक्ष्मीबाई यांनी १८५१ मध्ये एका मुलाला जन्म दिला त्याचे नाव त्यांनी दामोदर राव ठेवले. परंतु दुर्दैवाने केवळ चार महिन्यांतच त्याचा मृत्यू झाला. राणी लक्ष्मीबाई आपल्या मुलाच्या मृत्यू पच्छात नाखूष होत्या, परंतु महाराजांनी त्यांच्या चुलत भावाचा मुलगा आनंद राव याना दत्तक घेतले, ज्याचे नाव नंतर दामोदर राव असे ठेवण्यात आले. दामोदर राव यांच्या नामकरणाच्या एक दिवस आधी गंगाधर राव यांचा मृत्यू झाला. राणी लक्ष्मीबाई पहिल्या मुलाच्या दुःखाने उभारत नाही तेवढ्यात दुसरे दु:ख आले, परंतु लक्ष्मीबाईं खचल्या नाहीत तर हिम्मत ठेवली.

महाराजांच्या मृत्यूनंतर तत्कालीन गव्हर्नर जनरलने दामोदर राव यांना उत्तराधिकारी बनविण्यास नकार दिला कारण दामोदर रावांना दत्तक घेतलेलं होत. ब्रिटिश नियमाननुसार सिंहासनावर स्वतःचेच वारसदार पुत्र बसू शकतात. १८५४ मध्ये, राणी लक्ष्मीबाई यांना ६०,००० रुपयांची पेंशन देऊन किल्ल्याचे सोडून जाण्याचा आदेश देण्यात आला. इंग्रज त्यांना नावाने न बोलवता झाशीची राणी म्हणून हाक मारत असे. हे नाव नंतर इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरात लिहले गेले. १८५८ मध्ये राणी लक्ष्मीबाईनी त्यांचा घोडा बादलला घेऊन किल्ला सोडून गेल्या.

१८५७ च्या सुरुवातीस एक अफवा पसरली की ईस्ट इंडिया कंपनीसाठी लढणारे सैनिकांच्या कारतूस मध्ये गाय व डुकराचे मांस मिसळवलेले आहे. त्यामुळे धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आणि देशभरात बंड चालू झाला. १० मे १८५७ ला भारतीय बंद मेरठपासून सुरु झाला. जेव्हा हि खबर झाशीमध्ये पोहचली तेव्हा राणी लक्ष्मीबाईंनी ब्रिटीश अधिकाऱ्याला आपल्या सुरक्षेसाठी सैनिक देण्याची मागणी केली व ब्रिटिशांनी हि मागणी मान्य केली. काही दिवस राणी लक्ष्मीबाईंनी सगळ्या बायकांना विश्वासात घेऊन सांगितले कि इंग्रज भित्रे आहेत आणि त्यांना भिण्याचे काहीच कारण नाहीये. झाशीला बंडखोरांनपासून वाचविण्यासाठी रानी लक्ष्मीबाई यांना ब्रिटीशांच्या वतीने झाशीचा ताबा देण्यात आला.

jhashichi rani laxmi bai

Source: YouTube

काही काळ राणी लक्ष्मीबाई लक्ष्मीबाई ब्रिटिशांच्या विरोधात बंड करण्यास नकार देत होते. पण १८५७ मधील सप्टेंबर-ओक्टोम्बरच्या सुमारास, राणीने झांसीला शेजारील राजांच्या सैन्याच्या हल्ल्यापासून बचावले होते. ब्रिटीश सैन्य झांसीची परिस्थिती हाताळण्यासाठी पोहचले, पण ते पोहोचल्यानंतर झांसीला भारी तोफा आणि सैनिकांनी सुरक्षित ठेवलेले पाहिले. इंग्रजांनी राणी लक्ष्मीबाईंना शरणागतीसाठी सांगितले परंतु त्यांनी साफ नकार दिला. राणी राणी लक्ष्मीबाईंनी घोषणा दिल्या कि, “आम्ही स्वातंत्र्यासाठी लढू, भगवान कृष्णाचे नाव घेऊन बोले कि, जर आम्ही जिंकलो तर विजय साजरा करू आणि हरलो तर रणांगणात मारले जाऊ आणि आम्हाला अविनाशी यश व मोक्ष मिळेल.” त्यांनी ब्रिटिशांविरूद्ध संरक्षण मोहीम सुरू केली.

जानेवारी १८५८ मध्ये, इंग्रजांची सेना झांसीच्या दिशेने गेले, इंग्रजांच्या सैन्याने झांसीला चारही बाजूनी वेढा घातला. मार्च १८५८ मध्ये ब्रिटिशांनी जोरदार गोळीबार सुरू केला. राणी लक्ष्मीबाई लक्ष्मीबाई यांनी तात्या टोपेला मदतीसाठी मागणी केली आणि तात्या टोपेने २० हजार सैनिकांसोबत लढा दिला परंतु ते पराभूत झाले. तात्या टोपे यांच्याबरोबरच्या लढ्यात ब्रिटीश सैन्य वाढतच होते आणि झांसीला वेढतच होते. ब्रिटीश सैन्यांच्या तुकड्या आता किल्ल्यामध्ये प्रवेश करायला सुरुवात केली आणि मार्गात येणाऱ्या प्रत्येक पुरुषांना किंवा महिलांना मारत होते.

दोन आठवडे त्यांच्यात लढा सुरू होता आणि शेवटी इंग्रजांनी झांसीला काबीज केले. परंतू राणी लक्ष्मीबाई कश्या बश्या त्यांचा घोडा बादलवर बसल्या. त्यांनी त्यांच्या पुत्राला पाठीवर बांधले होते आणि त्या किल्ल्यातून निसटल्या पण वाटेतच त्यांचा priy घोडा बादल याचा मृत्यू झाला. त्यांनी काल्पी येथे आश्रय घेतला, जिथे त्या तात्या टोपे यांना भेटल्या. २२ मे रोजी ब्रिटिशांनी काल्पीवर हल्ला केला आणि राणी लक्ष्मीबाईंच्या नेतृत्वाखाली पुन्हा तात्या टोप यांच्या सेनेला हरवले. पुन्हा एकदा राणी लक्ष्मीबाई आणि तात्या टोपे यांना ग्वालियरकडे पलायन करावे लागले.

१७ जून रोजी ग्वालियरच्या लढाईत राणी लक्ष्मीबाईना वीरगति प्राप्त झाली. इंग्रजांनी तीन दिवसातच ग्वालियरचा किल्ला ताब्यात घेतला. इंग्रजांनी स्वत: राणी लक्ष्मीबाईना शूर योद्धा म्हंटले ज्या मरत्या क्षणापर्यंत लढत होत्या. असे समजले जाते की जेव्हा त्या लढाईत बेशुद्ध पडल्या होत्या तेव्हा एका ब्राह्मणाने त्यांना पाहिले आणि आपल्या आश्रमात नेले जेथे त्या मरण पावल्या. त्यांच्या या साहसासाठी त्यांना भारतीय स्वातंत्र्य स्वातंत्र्य चळवळीची वीर म्हणून ओळखले जाऊ लागले. राणीचा मुख्य हेतू आपल्या दत्तक पुत्राला सिंहासनवर बसवण्याचा होता.

हे पण पहा: किंग ऑफ बांद्रा संदीप बच्चे यांच्या सर्व सुविधांन युक्त रिक्षाबद्दल माहित आहे का.?

About the author

admin

Advertise