Indian Proud Uncategorized

डॉक्टर अ. वेलूमणी:२ लाखांपासून ते 3,300 कोटी! एका भूमिहीन शेतकऱ्याच्या मुलाचा प्रेरणादायी प्रवास.

डॉक्टर . वेलूमणी: एका भूमिहीन शेतकऱ्याच्या मुलाचा प्रेरणादायी प्रवास.

डॉक्टर अ. वेलूमणी: १९५९ मध्ये तमिळनाडूतील कोईमतूर गावाच्या बाहेरील एका खेड्यात भूमिहीन शेतकर्यांच्या घरी जन्मलेल्या चार मुलांपैकी एक मुलगा म्हणजे डॉक्टर अरोकियास्वामी वेलूमणी हे होते. त्याची आई संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी सांभाळत होती. त्यांनी आपल्या दुग्ध व्यवसायासाठी दोन म्हशीं घेतल्या व त्यातून मिळणाऱ्या पैशातून १० वर्षे आपल्या कुटुंबाची सांभाळ केला.

डॉक्टर अ. वेलूमणी

ते गावात वाढले होते आणि गावात शिक्षणाची जास्त व्यवस्त्या नसल्याने, त्यांनी उत्तम शिक्षणाची सुविधा शोधण्यासाठी गावाच्या बाहेर जाण्याचा निर्णय घेतला. त्या काळात, तरूण लोक महाविद्यालयीन शिक्षण फक्त चांगली पत्नी मिळावी म्हणून जात होते. त्या काळात, पदवीधरांना चांगली बायको मिळण्याची आशा होती, म्हणूनच तरूण लोक महाविद्यालयीन शिक्षण घेत होती.

डॉक्टर अ. वेलूमणी

Source: Quartz

१९ व्या वर्षी त्यांनी बी.एस.सी. ची पदवी घेतली, बी.एस.सी. ची पदवी घेऊन पण त्यांना चांगली नोकरी मिळू शकली नाही. नंतर त्यांना नशीबाने म्हणा किंवा योगायोगाने कोईमतूर मधील जेमिनी कॅप्सूल या एका लहान फार्मास्युटिकल कंपनीमध्ये 150 रुपये महिना अशी नोकरी मिळाली. ते अजूनही आठवणीने सांगतात कि त्यांनी कामातले ५० रुपये स्वतःला ठेवले आणि बाकीचे पैसे त्यांच्या पालकांना पाठविले. चार वर्षे नौकरी केल्यानंतर त्यांनी जेमिनी कॅप्सूल कंपनी सोडून भाभा संशोधन केंद्रामध्ये सहभागी होण्याच्या निर्णय घेतला.

डॉक्टर अरोकियास्वामी वेलूमणी म्हणतात, “माझे आईवडील खूप गरीब होते. माझ्यासाठी ते साधी एक चप्पल आणि पॅन्ट हि विकत घेऊ शकत नव्हते. आज जे घडले ते माझ्यासाठी होते परंतु मी माझ्या जिद्दीने आणि धीर धरून आलो आहे, सर्वकाही ‘पिरॅमिड च्या टॉप’ ला आहे.”

डॉक्टर अ. वेलूमणी

Source: Rediff.com

नंतर, लवकरच त्यांनी स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये काम करणाऱ्या एका मुलीसोबत म्हणजेच सुमती यांच्याशी लग्न केले. विवाह झाल्यानंतर त्यांनी थायरॉइड बायोकेमेस्ट्रीच्या क्षेत्रातील डॉक्टरेटची सुरुवात केली आणि थायरोकेअरमध्ये दोन लाखांची गुंतवणूक केली. आज त्याच्या भावांपैकी एक भाऊ कंपनीच्या सीएफओ(मुख्य वित्त अधिकारी / Chief Financial Officer) म्हणून कंपनीचे काम बघतात. त्याची पत्नी आपल्या व्यवसायाच्या मानवी संसाधन (Human Resource) विभागाचा सांभाळ करतात आणि ते त्यांना त्यांचा खूप मोठा आधार मानतात.

मे, २०१६ मध्ये, त्यांच्या कंपनीने ३३७७ कोटी मूल्याकंनासह भारतीय बाजारपेठेतील त्याचे पहिले पाऊल ठेवले. अरोकियास्वामी वेलूमणी यांच्याकडे आज कंपनीचे 64 टक्के शेअर्स आहेत. ज्याची किंमत २११,४१.९७ दशलक्ष रुपये इतकी आहे.

डॉक्टर अ. वेलूमणी

Source: Zersey

डॉक्टर अरोकियास्वामी वेलूमणी यांच्या कंपनीने जगातील सर्वात मोठी थायरॉईड कंपनी असल्याचा दावा केला आहे. या कंपनीचे भारतासह, नेपाळ, बांगलादेश आणि पूर्व मध्येही आऊटलेट्स(दुकाने) आहेत. कंपनीचे भारतातील आरोग्य तपासणी प्रयोगशाळांचे नेटवर्क हे, भारतातील सर्वात मोठ्या नेटवर्कपैकी एक आहे. ज्यामध्ये जवळजवळ ३० लाख पेक्षा जास्त वैद्यकीय तपासणी केल्या जातात आणि ९ दशलक्ष नमुने प्रक्रियारत आहेत.

हे पण पहा: मलावथ पूर्णा: एव्हरेस्ट सर करणारी सर्वात लहान मुलीबद्दल माहित आहे का.??

Advertise