Entertainment Uncategorized

सहा महिने झोपणारी २३ वर्षाची लेडी कुंभकर्ण

स्टॉकपोर्ट  येथील सहा महिने झोपणारी २३ वर्षाची लेडी कुंभकर्ण बेथ गुडियर

बेथ गुडियर: कुंभकर्ण सलग सहा महिने झोपायचा हे आपण सगळ्यांनी रामायणामध्ये नक्कीच वाचले असेल. जर कोणी सकाळी लवकर उठत नसले तर आपण त्याला कधी-कधी कुंभकर्ण म्हणून चिडवतो.

बेथ गुडियर

Source: Caters News Agency

लहानपणी वाटायचे कुंभकर्णासारखी व्यक्ती खरंच असेल का.? त्या प्रश्नाचे उतार आज सापडले आहे. हो कुंभकर्णासारखी सहा महिने झोपणारी व्यक्ती आजही आहे.

स्टॉकपोर्ट येथील बेथ गुडियर हि २३ वर्षाची मुलगी गाढ झोपल्यानंतर चक्क सहा महिनांच्या आधी उठत नाही. ब्रिटनमधील लोक तिला स्लीपिंग ब्युटी असे म्हणतात.

बेथच्या रुग्णालयात सगळ्या प्रकारच्या चाचण्या करण्यात आल्या आहे. परंतु, त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही, असे तिच्या आईने सांगितले.
बेटाचा आतापर्यंतचा ७५ टक्के वेळ झोपेतच गेला आहे.

एका दिवसात ती २२ तास झोपते आणि केवळ २ तासच उठते. झोपेतून उठल्या नंतर ती आहार घेते. बेथला “स्लीपिंग ब्युटी सिन्ड्रोम” नावाचा आजार आहे. सहा महिने झोपण्याच्या बेथची कथा इतर लोकांना परिकथेसारखी वाटते.

बेथ गुडियर

Source: Daily Mirror

मात्र, आईला तिच्या भवितव्याची चिंता सतावत आहे. ती उद्या झोपेतून उठेल, मात्र वेळेसोबत चालावे लागेल तेव्हा तिचे कसे होईल, अशी चिंता बेथच्या आईला वाटते. तिला पुन्हा कधी झोप येईल हेही सांगता येत नाही.

त्यामुळे ती मित्र-मैत्रिणींना जास्त भेटतहि नाही. बेथची आई जेव्हा तिच्या भविष्याचा विचार करते तेव्हा त्यांना खूप दुःख होते, असे त्या सांगतात.
तिच्या आईने देखभालीसाठी केअर टेकरची व्यवस्था पण केली आहे. बेथला फिरतानाही प्रचंड थकवा येतो. त्यामुळे तिला व्हीलचेअरची गरज भासते.

हे पण पहा: बिअर बार मध्ये जाणाऱ्या जिराफबद्दल माहिती आहे का.?

About the author

admin

Advertise