Entertainment Uncategorized

T-२० सामन्यात एकही रन न देता १० विकेट घेणाऱ्या आकाशबद्दल माहिती आहे का.?

एका स्थानिक टी -20 सामन्यात राजस्थानच्या एका 15 वर्षाच्या मुलाच्या एका विलक्षण दुर्मिळ कामगिरी केली. त्या सामन्यात त्याने एकही रन न देता १० बळी घेण्याचा विक्रम केला आहे.

akash choudhari

मध्यमगती डावखुरा गोलंदाज आकाश चौधरी याने हा कारनामा दिशा अकॅडेमीकडून खेळताना केला आहे. पर्ल अकॅडेमी विरुद्धच्या सामन्यात त्याने हि दुर्मिळ कामगिरी स्वर्गीय भवर सिंग टी 20 स्पर्धेमध्ये केली.

सामन्याच्या सुरुवातीस, पर्ल अकॅडेमीने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. दिशा अकॅडेमीने २० षटकात १५६ धावा केल्या.

प्रत्युत्तरात, पर्ल अॅकॅडेमीने फक्त ३६ धावा केल्या. आकाश चौधरीच्या माऱ्यासमोर पर्ल अॅकॅडेमीचा कोणताच फलंदाज टिकू शकला नाही. डावखुरा वेगवान गोलंदाज आकाशने स्पेलच्या पहिल्याच षटकात दोन बळी घेत निर्धाव ओव्हर टाकली.

त्याच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकाची गोलंदाजी पहिल्या षटका सारखीच होती. पुढच्या २ षटकामध्येहि त्याने एकही धाव न देता अजून २-२ फलंदाज दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकामध्ये आऊट केले.

शेवटच्या आणि अंतिम षटकात अजून अचूक मारा करून त्याने चार बळी घेतले ज्यात हॅटट्रिकचा समावेश सुद्धा होता. त्याची हि कामगिरी खूप आश्चर्यकारक होती ज्यामध्ये त्याने ४ षटकामध्ये एकही धाव न देता १० विकेट घेतले.

हे पण पहा: किंग ऑफ बांद्रा संदीप बच्चे यांच्या सर्व सुविधांन युक्त रिक्षाबद्दल माहित आहे का.?

Advertise