Entertainment Indian Proud

१० सुंदर आयएएस-आयपीएस ज्यांचे सौंदर्य बॉलीवूड अभिनेत्रींनाही लाजवेल

आयएएस-आयपीएस अधिकारी या जागेवर काम करणे अतिशय आव्हानात्मक आणि जबाबदारीचे आहे, त्यासाठी भरपूर योगदान आणि क्षमता आवश्यक आहे. आपल्या देशामध्ये काही सुंदर चेहरे आहेत जे ही जबाबदारी सोप्या पद्धतीने हाताळत आहेत. देशातील सुंदर महिला आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांची यादी आहे, ज्यांनी आपल्या समाजाची समज बदलली आहे.

या स्त्रियांना “बुटी विथ ब्रेन्स”चे उत्तम उदाहरण आहेत. कोणत्याही सौंदर्यविषयक सजवण्याच्या प्रयत्नांऐवजी या महिलांनी आपल्या क्षमतेसह आपल्या राष्ट्राची सेवा करण्याचा निर्णय घेतला आणि दुसर्यांसाठी एक स्तर सेट केला आहे. ते धैर्यवान असतातच, त्यांच्याकडे दृढ इच्छाशक्तीही असते, त्यांना तीक्ष्ण विचारक्षमता पण असते, ते सुंदर आहेत आणि महिला पण.

आपण अश्या १० सुंदर आयएएस-आयपीएस पाहू ज्यांचे सौंदर्य बॉलीवूड अभिनेत्रींनाही लाजवेल:

  1. स्मिता सभरवाल १० सुंदर आयएएस-आयपीएसपश्चिम बंगालमधील दार्जिलिंग शहरात स्मिता सभरवाल यांचा जन्म १९७७ साली झाला. त्या, २००१ बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी कॉमर्समध्ये, सेंट फ्रान्सिस डिग्री कॉलेज, हैदराबाद येथून पदवी पूर्ण केली आहे. स्मिता यांना ‘पीपल्स ऑफिसर’ या नावाने ओळखल्या जातत, ज्यांना या शीर्षकासह सन्मानित करण्यात आले आणि एक महिला म्हणून ही पदवी भेटणे अभिमानाची बाब आहे. मुख्यमंत्री कार्यालयातील पहिली महिला आयएएस अधिकारी म्हणून त्यांची नेमणूक झाली होती. तिचे पती डॉ. आकून सभरवाल आयपीएस अधिकारी आहेत.
  2. रिजू बाफना १० सुंदर आयएएस-आयपीएस रिजू बाफना यांचा जन्म आणि संगोपन छत्तीसगडमध्ये झाले. त्यांनी दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून २०११ साली अर्थशास्त्र विषयात मास्टर्स केले आहेत आणि किरोरी मल कॉलेजमधून पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी सिव्हिल सर्व्हिसेसची परीक्षा 2013 मध्ये दिली व त्यात त्यांचा 77 वा क्रमांक होता आणि त्या 2014 मध्ये आयएएस अधिकारी बनल्या. आयएएस अधिकारी बनण्यापूर्वी ते केंब्रिज इकोमेंट पॉलिसी असोसिएट्समध्ये काम करीत होत्या. गेल्या वर्षी त्यांनी त्यांच्या बॅचमेट अवी प्रसाद यांच्याशी विवाह केला आणि ते पण एक आयएएस अधिकारी आहेत.
  3. मेरिन जोसेफ १० सुंदर आयएएस-आयपीएस मेरिन जोसेफ या केरळ भागातील सर्वात तरुण आयपीएस अधिकारी आहेत, ज्यांनी २०१२ मध्ये वयाच्या २५ व्या वर्षी यू.पी.एस.सी. ची परीक्षा उत्तीर्ण केली. पहिल्याच प्रयत्नात त्यांनी 2012 मध्ये यू.पी.एस.सी. ची परीक्षा उत्तीर्ण केली. मेरिनचा जन्म आणि संगोपन दिल्लीमध्ये झाले. सेंट स्टीफन्स कॉलेजमधून त्यांनी बी.ए. आणि एम.ए. ची पदवी पूर्ण केली. तिचे वडील कृषी मंत्रालय मध्ये एक प्रमुख सल्लागार आहेत आणि त्यांची आई एक अर्थशास्त्र विषयाची शिक्षिका आहे. G२० देशांच्या अधिकृत युथ कार्यक्रमासाठी मेरिनची निवड करण्यात आली होती आणि त्यांनी Y२० शिखर परिषदेसाठी भारतीय प्रतिनिधी मंडळाच्या नेतृत्व केले होते. २०१५ मध्ये त्यांनी कोट्टयममधील मानसोपचारतज्ज्ञ क्रिस अब्राहम यांच्याशी विवाह केला.
  4. कांचन चौधरी भट्टाचार्य १० सुंदर आयएएस-आयपीएस कांचन १९७३ ते २००७ पर्यंत आयपीएस अधिकारी होत्या. पोलीस महासंचालक बनणाऱ्या त्या पहिल्या महिला आयपीएस अधिकारी होत्या. त्या हिमाचल प्रदेशच्या राहवासी आहेत आणि इंद्रप्रस्थ महाविद्यालयातून, दिल्ली येथे इंग्रजी साहित्यात पदवीचे शिक्षण पूर्ण केले. कांचन चौधरी भट्टाचार्य यांना राष्ट्रपती पदक आणि राजीव गांधी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. कांचन यांनी हरिद्वारमधून २०१४ च्या सार्वजनिक निवडणुकीत विजयी झाल्यानंतर आम आदमी पक्षामध्ये प्रवेश केला.
  5. मीरा बोरवणकर १० सुंदर आयएएस-आयपीएस मीरा बोरवणकर या १९८१ च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत. त्या पंजाबी कुटुंबामधील आहेत आणि तिचे वडील बीएसएफमध्ये होते. मीरा यांनी त्यांची पदवी जालंधर येथून पूर्ण केली आहे. त्या महाराष्ट्र भागातील पहिल्या महिला आयपीएस अधिकारी आहेत ज्या फजिका, पंजाबमधील आहेत. त्यांना ‘लेडी सुपरकोप’ म्हणूनही संबोधले जाते. दाऊद इब्राहिम आणि छोटा राजन यांच्या टोळीतील सदस्यांना अटक करण्यासाठी त्यांचा सत्कारही करण्यात आला आहे. १९९४ साली जळगाव येथे त्यांनी सेक्स स्कॅंडलमधील लोकांना अटक केली होती. ‘मर्दानी’ ही बॉलीवूड फिल्म त्यांच्या कारकिर्दीवर आधारित आहे.
  6. संजुक्ता पराशर १० सुंदर आयएएस-आयपीएस संजुक्ता पराशर यांचा ३ ऑक्टोबर १९७९ रोजी आसाममध्ये झाला. संजुक्ता या २००६ बॅचमधील आयपीएस अधिकारी आहेत. त्यांचा जन्म जरी आसाममधील असला तरी त्यांनी त्यांचं शिक्षण इंद्रप्रस्थ महाविद्यालय, नवी दिल्ली येथून राज्यशास्त्र या विषयात पदवी प्राप्त केली आहे. आसाममधील त्या पहिल्या महिला आयपीएस अधिकारी आहेत आणि आसाममधील बोडो अतिरेक्यांविरोधात त्या लढल्यासुद्धा आहेत. सध्या, सोनितपूर येथे पोलिस अधीक्षक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आयएएस अधिकारी पुरू गुप्ता यांच्याशी त्यांचा विवाह झाला आहे.
  7. रोशन जैकब १० सुंदर आयएएस-आयपीएस रोशन जैकब यांचा जन्म २५ डिसेंबर १९७८ रोजी केरळा इथे झाला. त्यांनी 2004 मध्ये यू.पी.एस.सी. परीक्षा उत्तीर्ण केली. सध्या त्या उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी आहेत.
  8. वंदना प्रेयसी १० सुंदर आयएएस-आयपीएस वंदना प्रेयसी यांचा जन्म २१ फेब्रुवारी १९७४ रोजी बिहारमध्ये झाला. त्या २००३ च्या बॅचमधील आयएएस ऑफिसर आहेत. वंदना यांनी दिल्लीमधील सेंट स्टीफन्स मधून त्यांचे कॉलेज पूर्ण केले आहे. त्या बिहारमधील सिवान येथे जिल्हाधिकारी आहेत. वंदना प्रेयसी या “नो नॉन्सेन्स आणि बोल्ड” अशी वंदना प्रेयसी यांची ओळख आहे. बिहारमधील सर्व महिलांसाठी त्या एक उत्तम प्रेरणास्थान आहे. बिहारमध्ये घडणाऱ्या गुन्ह्यांन विरुद्ध उभ्या राहणाऱ्या त्या एकमेवा महिला अधिकारी आहेत.
  9. विमला मेहरा १० सुंदर आयएएस-आयपीएस देशाच्या विशेष आयुक्त पोलीस पदापर्यंत पोहोचणाऱ्या त्या पहिल्या महिला अधिकारी आहेत. विमला मेहरा या १९७८ च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत, ज्या अरुणाचल प्रदेश, गोवा, मिझोरम आणि केंद्रशासित प्रदेशात या भागात आयपीएस अधिकारी होत्या. त्यांनी २०१२ मध्ये तिहार कारागृहाचे डायरेक्टर जनरल म्हणून नेतृत्व करणाऱ्या त्या किरण बेदीनंतर दुसऱ्या महिला अधिकारी आहेत. त्यांनी महिलांसाठी हेल्पलाइन क्रमांक १०९१ सुरू केला, त्यांनी स्त्रियांसाठी आत्मरक्षानाचे कार्यक्रमही प्रोमोट केले आहेत.
  10. बी.चंद्रकला १० सुंदर आयएएस-आयपीएस चंद्रकला यांचा जन्म २७ सप्टेंबर १९७९ रोजी आंध्र प्रदेशमध्ये झाला. यूपी भागातील २००८ च्या बॅचमधील त्या एक आयएएस अधिकारी आहेत. सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेत त्यां ४०९ व्या क्रमांकवर होत्या. सध्या त्या उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमध्ये जिल्हाधिकारी म्हणून काम करत आहेत. चंद्रकला ह्या एका जमाती कुटुंबातील आहे. त्यांनी हैदराबादमधील कोटी महिला महाविद्यालयातून बी.ए. ची पदवी प्राप्त केली आहे.

See Also : An IPS Officer, Sachin Atulkar, Who Looks Like a Bollywood Star Going Viral

About the author

admin

Advertise