Entertainment Uncategorized

मन्या सुर्वे: मुंबईतील गुन्हेगारी जगतातील पहिल्या हिंदू डॉनची कथा

मन्या सुर्वे:

मन्या सुर्वेमनोहर अर्जुन सुर्वे उर्फ मन्या सुर्वे हा १९७० व १९८० च्या दशकातील अंडरवर्ल्डचा चेहरा ज्याने संपूर्ण अंडरवर्ल्डला हादरवून सोडले. ११ जानेवारी १९८२ रोजी वडाळ्यातील एका कॉलेज मध्ये पोलिसांनी त्याचा एन्काऊंटर केला होता. दुपारी 1:30 वाजता, मुंबई पोलिसांनी मन्या सुर्वेला, वडाला बस डेपो आणि अंबेडकर महाविद्यालयाच्या परिसरातील सर्वत्र बाजूने घेरून मारले होते. ज्यावेळी एन्काऊंटर झाला त्यावेळी मन्या त्याच्या प्रियसीला भेटायला गेलो. भारतातील गुन्हेगारीतील हा सर्वात पहिला लाईव्ह एन्काऊंटर होता.

तुम्हाला असे वाटत असेल की मन्या सुर्वे एक गुन्हेगारी पार्श्वभूमीतून आला असेल, पण तसे नव्हते तो एक सुशिक्षित आणि अतिशय बुद्धिमान विद्यार्थी होता. त्या वेळी, त्यांने ७८% पाडून पदवी परीक्षा उत्तीर्ण केली होती. शाळेत आणि महाविद्यालयात, मन्या एक अतिशय साधा व सज्जन मुलगा होता. परंतु त्याचा मोठा भाऊ गुन्हेगारी क्षेत्रात होता आणि त्याच्या भावामुळे मन्याला या क्षेत्रात यावे लागले. काही काळातच मन्या सुर्वे अंडरवर्ल्डचा डॉन बनला. त्या काळात मुंबईमध्ये मन्याचीच दहशत होती. मूळचे बारामतीचे असलेले इसाक बागबान हे मुंबईचे तत्कालीन एस.पी. होते. त्याच कालावधीत त्यांनी मन्या सुर्वे चा एन्काऊंटर केला होता.

मन्या सुर्वेमन्या सुर्वे च्या आयुष्यावर ‘शूट आउट अॅट वडाळा’ हा चित्रपटात बनवला होता, ज्यात जॉन अब्राहमने मन्या सुर्वेच्या भूमिकेला एकदम उत्तमरीत्या न्यान(अभिनयला) दिला आहे. या चित्रपटामधून तुम्ही त्याच्या आयुष्याबद्दल सहज समजू शकता.
मुंबई अंडरवर्ल्डमधील जुने डॉन आणि पोलिसांसाठी मन्या सुर्वे एक डोकेदुखी झाला होता. प्रत्येकजण त्याला कस मारता येईल हे पाहत होते, परंतु मन्या खूपच चतुर होता. म्हणूनच पोलिसांना त्याला पकडणे फार अवघड झाले होते. मन्या सुर्वेचा एन्काऊंटर करण्यासाठी पोलिसांनी त्याच्या प्रेयसीला खोटं बोलून त्याला बोलावून घ्यायला लावले व त्याचा एन्काऊंटर केला.

मन्या सुर्वे याचे पुणे शहरासोबत खूप जबरदस्त संबंध होते. १९४४ साली महाराष्ट्रामधील रत्नागिरी जिल्ह्यातील रनपूर येथे त्याचा जन्म झाला. तो तिथे त्याची आई आणि त्याच्या सावत्र बापाबरोबर राहत होता. मन्या लहानपणापासून अतिशय हुशार होती व त्याला इंजिनियर व्हायचे होते. कॉलेजच्या काळात त्याच्या भावामुळे त्याला गुन्हेगारी क्षेत्रात वळावे लागले. पोलिसांचा बदला घेण्यासाठी त्याने एक गॅंग तयार केली व तो गुन्हेगारी क्ष्रेत्राकडे वळाला. १९६९ साली मान्या सुर्वे यांनी पहिला खून केला आणि त्याचे नाव चर्चेत आले. दाऊद इब्राहिमचा भाऊ इब्राहिम कास्करचा मर्डर मन्यानेच केला होता. दाऊदला या गोष्टीलाचा बदला मन्या सोबत घ्यायचा होता पण हे त्याला शेवट पर्यंत जमले नाही.दाऊद पण त्याच्या नावाने घाबरत होता. मन्याने दाऊदला अनेक वेळा मारण्याची धमकी हि दिली होती.

मन्या सुर्वेया खूनानंतर, मन्या आणि त्याच्या भावाला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. पुण्यातील येरवडा तुरुंगात त्यांना ठेवले होते. तो तुरूंगात भाई झाला होता. तुरुंगात त्याने अनेक कैदी त्याच्या गॅंगमध्ये सामील करून घेतले. तुरुंगातील प्रशासनही त्याला थकले होते. सुहास भटकळ नावाच्या कैद्यांसोबत त्याची तिथे दुश्मनी झाली. मन्या आणि सुहासचे तुरुंगात वेगवेगळे गट होते. त्यानंतर मन्याने तुरुंगात सुहासाच्या टोळीतील साथीदारांना मारू लागला. हा विषय प्रशासनाच्या लक्षात आला पण पुरावे सापडले नाहीत म्हणून मन्याला रत्नागिरीच्या तुरुंगात पाठविण्यात आले.

रत्नागिरीच्या तुरुंगात त्याला बेकायदा पाठवले म्हणून मन्याने तुरंगातच उपोषण सुरु केले. मन्या जेवत नसल्याने त्याची तब्बेत खराब झाली आणि त्याला लगेच रत्नागिरीमधील एका हॉस्पिटलमधे हलवण्यात आले. पण त्याच्या डोक्यात वेगळाच प्लांनिंग चालू होते. १४ नोव्हेंबर 1979 रोजी रत्नागिरीतील त्या हॉस्पिटलमधून पळून जाण्यात मन्या यशस्वी झाला. त्यानंतर ११ जानेवारी १९८२ रोजी त्याला एन्काऊंटरमध्ये ठार मारले, तोपर्यंत तो फरारच होता.

मन्या सुर्वेहॉस्पिटलमधून बाहेर पडल्यानंतर, त्याने पुन्हा त्याच्या टोळीची संख्या वाढवली. मन्या पुणे येथे तुरुंगात ९ वर्षे राहिल्यामुळे तो अतिशय हुशार आणि तरबेज गुन्हेगार झाला होता. पुण्यातील येरवड्यातील वास्तव्यानेच मन्याला अंडरवल्डचा बादशाह बनण्यास खूप मदत झाली. मन्याचे गुन्हे देखील खूप प्रमाणात वाढले. मन्याचा आत्मविश्वासही हजार पटीने वाढत गेला. आता तो दिवसाढवळ्या कोणाचाही मर्डर करू लागला.

हाजी मस्तान, बटलिवाळ पाहिल्यापासूनच्या टोळ्या आणि नव्याने वर येणारी दाऊदची टोळी अशा सगळ्या टोळ्यांना मन्या खुले आव्हान करत होता. भ्रष्ट पोलिसांना तो उघडा-नागडा करून मारत होता आणि बदला घ्यायचा. त्यामुळे पोलीस त्याला खूप घाबरून होते. कोणच त्याच्या विरोधात काहीच बोलत नव्हते. आणि तो लोकांमध्ये एक नायक बनू लागला. पोलिसांनी या गोष्टीचा बदला घेण्यासाठी त्याच्या विरुद्ध सापळा रचला आणि त्याला एन्काऊंटरमध्ये मारून टाकले. त्या एंकॉउंटरमध्ये पुणे जिल्ह्यातील बारामतीचे रहिवाशी असलेले तत्कालीन एसीपी इसाक बागबान यांनी नेतृत्व केले होते. त्यांनीच मन्या सुर्वेवर गोळ्या झाडल्या होत्या.

मन्या सुर्वेअसे म्हटले जाते की,मुंबईमध्ये मन्या सुर्वेंची दहशत खूप होती ज्यामुळे त्याकाळातील डॉन सुद्धा त्याला घाबरून होते. म्हणूनच त्याकाळातील मुस्लिम डॉननी पॉलिटिक्स खेळून मन्याचा एन्काऊंटर घडवून आणला होता. मन्यासाठी पुणे येरवडा तुरुंग हे सर्वात सुरक्षित ठिकाण होते. कारण तिथे त्याचे राज्य होते. तो सर्व कैद्यांचा बाप होता. पण तो तुरुंगातून पळाला आणि मुंबईत एक टोळी बनवली आणि त्यानंतर दोन ते तीन वर्षांत त्याला मारण्यात आले.

मनोहर अर्जुन सुर्वे उर्फ मन्या सुर्वे (मराठा) हा मुंबईतील गुन्हेगारी जगतातील पहिला हिंदू डॉन होता ज्याने संपूर्ण अंडरवर्ल्डला हादरवून सोडले. मन्याचा एन्काऊंटर भारतीय गुन्हेगारी जगतातील सर्वात पहिला एन्काऊन्टर असल्याची नोंद करण्यात आली आहे. आज जर मन्या सुर्वे जिवंत असता तर दाऊद, हाजी मस्तान, करीम लाला यांची गॅंग मुंबईतून कधीच गायब झाली असती, असे बोलले जाते.

हे देखील पहा: १० सुंदर आयएएस-आयपीएस ज्यांचे सौंदर्य बॉलीवूड अभिनेत्रींनाही लाजवेल

About the author

admin

Advertise